Published On : Mon, Jan 15th, 2018

खर्चात कपात करा आणि उत्पन्न वाढवा

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका नागरिकांना दर्जेदार सुविधा देत असते. त्यावर परिणाम पडू नये यासाठी मनपाची आर्थिक स्थिती चांगली राहायला हवी. यासाठी विविधखर्चात कपात करण्यात यावी आणि नवनवे उत्पन्नाचे स्त्रोत शोधून उत्पन्न वाढविण्यात यावे. पदाधिकारी आणि अधिकारी यांनी संयुक्त प्रयत्न करून प्रगतीपथावर असलेले सर्व प्रकल्पतातडीने पूर्ण करावे, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनपा मुख्यालयात आयोजित बैठकीत उपस्थितांना दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, आ.सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. नागो गाणार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल,नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसकर, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे,उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त राजेश मोहिते, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, नगररचना सहायक संचालक गावंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर उपस्थित होते.

आयुक्त अश्विन मुदगल यांनी मनपाच्या आर्थिक स्थितीचा अहवाल सादर केला. उत्पन्नाचे नवे स्त्रोत काय, याविषयीही सादरीकरण्याच्या माध्यमातून माहिती दिली.

ना. नितीन गडकरी यांनी यावेळी मनपाची आर्थिक स्थिती समजून घेतली. परिवहन विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या शहर परिवहन बसेस डिझेलऐवजी सीएनजीवर चालविता येतीलका, त्यामुळे उत्पन्नात वाढ करून परिवहन विभागाला होणारा तोटा कमी करता येईल का, विद्युत विभागाद्वारे अधिकाधिक सौर ऊर्जेचा वापर करून सध्या होणारा विजेवरचा खर्च कमीकरता येईल का, याबाबत विस्तृत चर्चा केली. राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या योजनेच्या माध्यमातून युनीटमागे मोजल्या जाणारी रक्कम कमी कशी करता येईल, याविषयी ऊर्जामंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. मनपा अधिकाऱ्यांनी त्यांना प्रस्ताव देऊन योजनेचा लाभ घेण्याचे निर्देश दिले.

नागपूर सुधार प्रन्यासद्वारे मनपाकडे हस्तांतरित होत असलेल्या मालमत्तेच्या प्रक्रियेचा आढावाही त्यांनी घेतला. नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती आणि मनपा आयुक्तांनी तातडीने हाविषय मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. नागपूर मनपाने उभारलेल्या एसटीपीच्या माध्यमातून सध्या किती पाणी महाजनकोला जातेय, त्यातून उत्पन्न किती, याविषयीही ना. गडकरीयांनी चर्चा केली. पुढील वर्षापर्यंत यातून मिळणारे उत्पन्न ५० कोटींच्या वर कसे नेता येईल, याबाबत पावले उचला, असेही निर्देश त्यांनी दिले.

मालमत्ता सर्वेक्षणाचे कार्य मार्च अखेरीपर्यंत पूर्ण करण्यात यावे. जीपीएस प्रणाली अथवा अत्याधुनिक प्रणालीचा वापर करण्यात यावा. यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त एजंसीची नियुक्ती करण्यात यावी, असेही निर्देश ना. गडकरी यांनी दिले.

नगर रचना विभागाच्या माध्यमातून नकाशे मंजूर करण्याच्या प्रक्रियेत बऱ्याच अडचणी येतात. यामुळे यामाध्यमातून येणाऱ्या उत्पन्नावरही परिणाम पडतो. ही प्रक्रिया जर किचकट असेलतर यासंदर्भात लवकरच शहरातील आर्किटेक्ट व तज्ज्ञ व्यक्तींची एक बैठक बोलावून त्यावर मते घेण्यात यावी. आपण स्वत: यामध्ये लक्ष देऊ. त्यामाध्यमातून सोपी आणि सुधारीत नवीपॉलिसी तयार करता येईल का, याबाबतही तातडीने विचार करण्यात यावा, असेही ना. नितीन गडकरी यांनी सांगितले. २४ बाय सात या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे उर्वरीत कामतातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही ना. गडकरी यांनी मनपा आयुक्तांना दिले. वित्तीय विभागाने मनपाची आर्थिक स्थिती नियमित करण्यासाठी दीर्घ व अल्प मुदतीच्या कर्जाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही ना. गडकरी यांनी दिले.बैठकीला मनापच्या संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.