Published On : Wed, Jan 1st, 2020

भाविकांची कोराडी मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी

नागपूर: नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करणार्‍या भाविकांची संख्या फार मोठी आहे. याचा अनुभव आज कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरातही आला. जगदंबेच्या दर्शनासाठी कोराडी येथे आज भाविकांनी प्रचंड गर्दी करून वर्षाच्या सुरुवातीला दर्शनाने सुरुवात करून जगदंबेचे आशीर्वाद घेतले.

भाविकांनी दर्शनासाठी केलेली प्रचंड गर्दी लक्षात घेता कोराडी जगदंबा देवी संस्थानने भाविकांच्या सुरक्षेसाठी 23 सुरक्षा रक्षक तैनात केले होते.

तसेच पोलिस स्टेशन कोराडीतर्फेही पोलिसांचा बंदोबस्त लावला गेला. आज पहाटे 5 वाजेपासूनच भाविकांनी जगदंबेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत ही गर्दी कायम होती.