Published On : Thu, Aug 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

दारूच्या नशेत वाद,अन् थेट चाकूहल्ला; नरेंद्रनगर पुलाजवळ गुंडाची हत्या

Advertisement

नरेंद्रनगर पुल के पास कुख्यात बदमाश की चाकू मारकर हत्या, आरोपी गिरफ्तार

नागपूर : नरेंद्रनगर पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या चाकूहल्ल्यात २५ वर्षीय गुंडाचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली. किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर आरोपीने चाकूने सपासप वार केल्याचे समोर आले. हत्या करून पळणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी तब्बल दीड किलोमीटर पाठलाग करून त्याला अटक केली. त्याच्याकडून हत्येत वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला.

मृताचे नाव गौरव पंकज रगडे असून आरोपी गौरव रामभाऊ राऊत याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांविरुद्धही यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रगडे हा नुकताच एका हत्या प्रकरणात जामिनावर कारागृहाबाहेर आला होता.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांच्या माहितीनुसार, छत्रपती चौक परिसरात ‘क्लाऊड किचन’ सुरू करण्याच्या तयारीत गौरव राऊत आणि रगडेची पत्नी होते. यासाठी राऊतने परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. राऊत आणि रगडेच्या पत्नीच्या भेटीगाठींबाबत रगडेला माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला.

गुरुवारी रगडे संबंधित खोलीत पोहोचला. त्यावेळी राऊत आपल्या मित्रांसोबत मद्यपान करत होता. रगडेने दारूच्या नशेत राऊतसोबत शिवीगाळ केल्याचा तसेच खोलीत तोडफोड करून काचा फोडल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली.

Advertisement

वाद वाढल्यानंतर रगडे तेथून पळू लागला. राऊतने त्याचा पाठलाग केला. नरेंद्रनगर पुलाजवळ रगडे खाली पडताच राऊतने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. गंभीर जखमी रगडे घटनास्थळी कोसळला. त्यानंतर आरोपी तेथून पसार होण्याच्या प्रयत्नात होता.

पोलिसांचा दीड किलोमीटर पाठलाग-
घटनेच्या वेळी अजनी पोलीस ठाण्याचे कर्मचारी मनीष भलमे आणि नरेश सावनकर परिसरात गस्तीवर होते. घटनेची माहिती मिळताच दोघे घटनास्थळी दाखल झाले. मनीष भलमे यांनी घटनास्थळाची पाहणी सुरू केली, तर नरेश सावनकर यांनी पसार होणाऱ्या आरोपीचा पाठलाग केला.

सुमारे दीड किलोमीटर पाठलाग केल्यानंतर नरेश सावनकर यांनी गौरव राऊतला पकडले. त्याच्याकडून हत्येत वापरलेला चाकू जप्त करण्यात आला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविला.

वादाला सुरुवात झालेली जागा अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते; मात्र हत्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.