Published On : Thu, Apr 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील दोन बेकायदा ‘अल्पसंख्यांक’ शाळांवर गुन्हा, बनावट कागदपत्रांचा पर्दाफाश!

Advertisement

नागपूर : शहरात शिक्षणाच्या क्षेत्राला धक्का देणारा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही अधिकृत परवानगी न घेता दोन ‘अल्पसंख्यांक’ शाळा सुरु ठेवून विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी संबंधित संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शाळांमधून विद्यार्थ्यांना बनावट टीसी आणि गुणपत्रिका देण्यात येत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

रहमतनगर आणि वांजरा परिसरात सुरु असलेल्या ‘गौसिया माध्यमिक शाळा’ आणि ‘जुबेदा माध्यमिक शाळा’ या दोन शाळांचा भंडाफोड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या चौकशीतून झाला. या शाळा भंडारा जिल्ह्यातील एका संस्थेमार्फत चालवल्या जात असल्याचे उघड झाले असून, त्यांच्याकडे कोणतीही शासकीय मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेला खेळ. शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांना दिली जाणारी शैक्षणिक कागदपत्रेच बनावट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे.

याचबरोबर, नोकरीच्या आशेने आलेल्या शिक्षकांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

Advertisement

राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने तत्काळ कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुढील भविष्य काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.