नागपूर: वाठोडा परिसरात गुन्हेशाखा सामाजीक सुरक्षा विभागाने अवैध डिझेल साठवण करणाऱ्या आरोपीवर यशस्वी कारवाई केली आहे.
दिनांक १५ ऑक्टोबर २०२५, सायंकाळी ८.४० ते ९.४५ या कालावधीत, वाठोडा हद्दीत पेट्रोलिंग करत असलेल्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली. त्या माहितीनुसार, सचिन संतोष बेनीबागडे (वय २७ वर्षे, रा. आराधना नगर, प्लॉट क्र. १७, बिडगाव, नागपूर) या ठिकाणी धाड टाकली असता, त्यांनी १२ प्लास्टिक कॅनमध्ये एकूण ३९५ लिटर डिझेल अवैधरित्या साठवलेले आढळले. या डिझेलची किंमत अंदाजे ३५,५५०/- रुपये होती.
पोलीसांनी आरोपीच्या ताब्यातून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध कलम २८७ भा. न्या. सं., सह कलम ३/७ अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी आरोपी व मुद्देमाल वाठोडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
ही कारवाई मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपूर शहर, मा. श्री. राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) आणि मा. श्री. अभिजीत पाटील, सहा पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राहुल शिरे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.