नागपूर : नागपूर गुन्हे शाखा युनिट ५ ने सीताबर्डीतील लक्ष्मी भवन, गौतमारे कॉम्प्लेक्समधील सेकंड फ्लोअर कॅफे या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर मंगळवारी (१७ जून) पहाटे छापा टाकून मोठी कारवाई केली. यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात हुक्का साहित्य, तंबाखूजन्य पदार्थ आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.
विश्वासार्ह माहितीच्या आधारे पोलिसांनी पहाटे १ ते ३.३० दरम्यान छापा टाकला. छाप्यात आढळले की, संबंधित कॅफेत फ्लेवर्ड तंबाखूयुक्त हुक्का ग्राहकांना पैसे घेऊन पुरवला जात होता.
अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे :
सनी विकास बोरकर (२५), अंबेडकर नगर, धरमपेठ
हर्ष सुरेश खांदरकर (२२), रामनगर, हिल टॉप
अर्पण रवी जमगडे (१९), सुदाम नगरी, हिल टॉप
बृणाल सुधीर गवारे (२०), अंबेडकर नगर, धरमपेठ
कारवाईदरम्यान पोलिसांनी हुक्का पॉट्स, विविध प्रकारचे फ्लेवर्ड तंबाखू, हुक्का संबंधी साहित्य व एकूण ₹३,८३,५८० किमतीचा ऐवज जप्त केला.
या प्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (COTPA) कायदा, २००३ च्या कलम ४(१), ५(१), २१ तसेच महाराष्ट्र हुक्का पार्लर प्रतिबंधक सुधारणा अधिनियम, २०१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, डीसीपी (डिटेक्शन) राहुल माकणीकर व एसीपी (गुन्हे शाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी केले. त्यांच्यासोबत चंद्रशेखर गौतम, राजेसिंग राठोड, रमेश टाकलिकर, रूपेश नानावतकर, अनीस खान, प्रविण भगत, गणेश ठाकरे, प्रमोद बवाणे, विशाल नागभिडकर, देवचंद थोते, सुनील यादव, अमोल भकते, सुधीर तिवारी आणि उर्वशी इवनाते या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.