नागपूर : वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीरपणे मोठ्या आवाजात डीजे वाजवून नागरिकांना त्रास दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे ८० हजार रुपयांचे दोन साऊंड बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे १०.२१ वाजताच्या सुमारास श्रावण नगर, खंडावणे टाऊन परिसरात घडली. बीट मार्शल म्हणून कर्तव्य बजावत असताना पोलिसांना एमडीटीवरून डीजेच्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, सचिन हनुमानलाल वर्मा (वय २३, रा. श्रावण नगर, वाठोडा) हा युवक कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात डीजे वाजवत असल्याचे आढळून आले. तसेच, पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचेही समोर आले.
या प्रकरणी सरकारतर्फे चंद्रकांत निंबार्थे (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम २२३, २७०, २८९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि सतीश आहेर करीत आहेत.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...
मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...
नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews
नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...









