Published On : Wed, Jul 10th, 2019

आदिवासी विकास योजनांच्या माहितीसाठी डॅशबोर्ड तयार करा – डॉ.परिणय फुके

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची/विविध उपक्रमांची माहिती व्हावी, तसेच त्याचा फायदा घेता यावा यासाठी या विभागाने डॅशबोर्ड तयार करावा, असे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी विभागाला दिले.

आज मंत्रालयात आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या डॅशबोर्डवर आदिवासी विकास विभागाची सर्व योजनांची माहिती तत्काळ मिळेल आणि याचा फायदा राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना होईल. आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना या योजनांचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना वेळेत होणे आवश्यक असून राज्य शासनामार्फत विदयार्थ्यांना देण्यात येणारी रक्कम वेळेत पोहोचेल याची खात्री करण्याबाबत निर्देश दिले

Gold Rate
May 22- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 160,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,900 /-
Silver/Kg ₹ 2,71,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मानव विकास निर्देंशांक ठरविण्यासाठी स्वयंयोजनेची व्याप्ती दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्याबाबत योजना तयार करणे, इतर विभागांनी आदिवासी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती वेगवेगळी ठेवणे आवश्यक आहे. नामांकित शाळा व एकलव्य शाळा याबाबत अधिक प्रभावी धोरण आखून जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ मिळेल या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्यमंत्री डॉ. फुके यांनी दिले.

डॉ. फुके यांनी आयुक्त कार्यालयाची पुनर्रचना, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती ५ नवीन कार्यालये निर्माण करणेबाबतचा मंत्रिमंडळ प्रस्ताव, पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था याठिकाणी सल्लागाराची नियुक्ती करण्याबाबत प्रस्ताव तयार करणे, आदिवासी विकास विभागातील स्वतंत्र बांधकाम व्यवस्थापन कक्षातील कामकाजाचे सादरीकरण करण्याचे निर्देश आज दिले.

राज्यमंत्री डॉ. फुके यांनी आदिवासी विकास विभागाच्या बांधकाम कक्षामार्फत चालू असलेल्या आश्रम शाळा व वसतीगृह बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी मुलींचे वसतीगृह प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. ज्या ठिकाणी बांधकामासाठी जमीन उपलब्ध नाही त्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा असे निर्देश दिले.

केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीच्या धर्तीवर चांगल्या दर्जाचे प्रशिक्षक नेमण्यात यावेत, असेही डॉ.फुके म्हणाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement