Published On : Fri, Feb 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘रेड कार्पेट मॅगझिन इंडिया’चे शुभारंभ; पहिल्या कवर फेससाठी अमृता फडणवीस यांची निवड !

Advertisement

नागपूर : सिव्हिल लाईन्स परिसरातील प्रेस क्लब नागपूर येथे 26 फेब्रुवारी 2026 रोजी ‘रेड कार्पेट मॅगझिन इंडिया’चा अधिकृत शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मॅगझिनची औपचारिक घोषणा करण्यात आली. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित व्यक्ती आणि पत्रकार यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

मॅगझिनच्या पहिल्या अंकासाठी कवर फेस म्हणून अमृता फडणवीस यांची निवड करण्यात आली. नागपूर आणि महाराष्ट्रातील स्टाइल आयकॉन म्हणून त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या सहभागामुळे लॉन्च कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

Gold Rate
June 12 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 48,200 /-
Gold 22 KT ₹ 1,37,400 /-
Silver/Kg ₹ 2,41,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना मॅगझिनच्या सीईओ व मॅनेजिंग डायरेक्टर राशी बुधरानी यांनी सांगितले की, फॅशन, ब्रँडिंग आणि मीडिया क्षेत्रातील नवोदितांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य हेतू आहे. नव्या डिझायनर्स, मॉडेल्स आणि उद्योजकांना राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करता यावी, यासाठी हे व्यासपीठ कार्य करेल, असे त्यांनी नमूद केले.

‘रेड कार्पेट कंपनी सर्व्हिसेस’च्या माध्यमातून मॅगझिन शूट, ब्रँड शूट, होर्डिंग शूट तसेच ‘रेड कार्पेट स्पॉट-लाइट पॉडकास्ट’ या नव्या उपक्रमांचीही सुरुवात जाहीर करण्यात आली. या सेवांमुळे स्थानिक प्रतिभेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाला कृपा सावलानी, डॉ. रितु सिंह चौहान, अरुंधती रामभद्र, नगरसेविका माया ताई हाडे (प्रभाग 36), अजीज शाह आणि वरुण दुर्योधन यांची उपस्थिती लाभली.

लॉन्च सोहळ्यात फॅशन आणि मीडिया क्षेत्रातील बदलते ट्रेंड्स, डिजिटल ब्रँडिंगचे महत्त्व आणि भविष्यातील योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागपुरातील फॅशन व मीडिया विश्वासाठी हा उपक्रम नवी संधी आणि सकारात्मक पाऊल म्हणून पाहिला जात आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

रोहित पवार का आंदोलन केवल दिखावा ...#news #latestnews #maharashtra #maharashtranews

रोहित पवार का आंदोलन केवल दिखावा ...#news #latestnews #maharashtra #maharashtranews

कबाड़ से छात्र ने बनाई अनोखी याइक ...#news #latestnews #maharashtranews #maharashtra

कबाड़ से छात्र ने बनाई अनोखी याइक ...#news #latestnews #maharashtranews #maharashtra

कचरे के ढेर में मिली नवजात बच्ची ...#news #crime #latestnews #maharashtra #maharashtranews

कचरे के ढेर में मिली नवजात बच्ची ...#news #crime #latestnews #maharashtra #maharashtranews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

गोवंश तस्करी गिरोह पर पहली बार मकोका ...#crime #latestnews #nagpurnews #vidarbha #maharashtra

गोवंश तस्करी गिरोह पर पहली बार मकोका ...#crime #latestnews #nagpurnews #vidarbha #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges