Published On : Sat, May 28th, 2022

गो मासाचा ट्रक पकडला

Advertisement

नागपुर वरून हैदराबादला जात असलेला गोमा साचा ट्रक आज सकाळी साडे सहाच्या दरम्यान नागपूर-हैदराबाद मार्गावर ब्राह्मणी ओव्हर ब्रिज जवळ बजरंग दल नागपुरच्या कार्यकर्त्यांनी पकडून बेला पोलिसांच्या हवाली केले,

गोमास निर्यातीवर बंदी असताना नागपुर वरून हैदराबाद ला जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH _40 Y 0163, मध्ये पिवळी नदी नागपूर वरून गोमास घेऊन ट्रक निघाल्याची गुप्तवार्ता बजरंग दलाचे शाखा अध्यक्ष सागर जयस्वाल यांना कळली त्यांनी लगेच आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वर ट्रकचा पाठलाग केला,

बोरखेडी टोल प्लाझा नंतर ब्राह्मणी ओव्हर ब्रिज जवळ एका ट्रक मधून पाण्याचे थेंब सांडत असताना सागर जयस्वाल यांना दिसले, त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी हा ट्रक थांबविला, ट्रक ड्रायव्हरला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली ट्रक च्या केबिन मध्ये बसलेले लोकसुद्धा अरेरावीची भाषा बोलू लागले, तेव्हा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थांबलेल्या ट्रक वर चढून बघितले असता प्लास्टिक मध्ये बर्फाच्या तुकड्यांनी झाकलेल्या अवस्थेमध्ये गोमास असल्याचे दिसून आले, कार्यकर्त्यांनी लागलीच बेला पोलीस स्टेशनची संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले, पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला विचारपूस करून ट्रक बेला पोलीस स्टेशन येथे आणला, ट्रक ड्रायव्हर शेख मोहत्ता सिम इमाम वत वय 32 वर्षे, रा, कामठी, मोहम्मद अब्दुल रहमान वय पन्नास वर्ष, नाजीर प्यारे खान वय 32, रितेश विजय करणंडवार वय 34, यांना अटक करण्यात आली

कामठी येथे गोमांसाचे अनेक मोठे व्यापारी असून तेच गो मासाचा व्यापार हैदराबाद येथे करत असल्याचे ट्रक ड्रायव्हर शेख मोहत्ता सिम इमाम वत यांनी सांगितले, सर्व आरोपींवर भा द वि कलम 5 अ, 5 क 9 क, 249, प्राण्यांचा छळ अधिनियम 1906 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास ठाणेदार व त्यांचे चमू करीत आहे,