Published On : Sun, Aug 29th, 2021

ग्रामीण भागातील महिलांसाठी समुपदेशन कार्यक्रम

– रत्न बहुउद्देशीय संस्थेचे आयोजन

नागपूर : ग्रामीण भागातील महिला सक्षम व्हाव्यात तसेच त्यांना महिला संरक्षणात्मक कायद्यांची माहिती मिळावी यासाठी रत्न बहुउद्देशीय संस्थेतर्फे खापरी पुनर्वस एरीया, येथील ब्ल्यू ड्रिम कॉन्व्हेंटच्या प्रांगणात महिला समुपदेशन व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात कौटुंबिक कलहग्रस्त महिलांसाठवधवा, परितक्त्या, पीडित व अन्यायग्रस्त, निराश्रीत, निराधार महिलांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका व संघर्ष वाहिणीच्या अध्यक्षा रंजना सूरजुसे, संस्थाध्येक्ष सुधिर राऊत, जि.प. शिक्षण विभागाचे सामाजिक कार्यकर्ते मनीष घरडे, समाजसेविका अल्का यादव संस्थेच्या समुपद पौर्णिमा कोकाटे, अस्मिता जांभूळकर आदी उपस्थित होत.

सहभागी पीडित महिलांकडून त्यांच्यावर होत असलेला अन्याय-अत्याचार, महिलांच्या व्यथा, कौटुंबिक कलह, सासरकडून होत असलेला शारीरिक व मानसिक छळ याबाबत माहिती मान्यवरांनी जाणून घेतली. महिलांच्या समस्यांबाबत मान्यवरांनी योग्य समूपदेशन केले. तसेच अशा पीडितांना महिलांबाबत असलेल्या विविध कायद्यांची माहिती देण्यात आली. अन्याय अत्याचार तसेच कौटुंबिक कलह यातून महिलांवर होत असेला त्रास यामुळे काही महिला आत्महत्या करण्याचा विचार करतात. अशा महिलांना धीर देण्याचे काम मान्यवरांनी केले. दरम्यान विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

महिला संरक्षणासाठी विविध कायद्यांची व सह कलमांबाबत विस्तृृत मार्गदर्शन करण्यात आले. केंद्र सरकारच्या महिला सक्षमीकरण योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रामाचा शेकडो महिलांनी लाभ घेतला. सूत्रसंचालन प्रीती राऊत, यांनी तर आभार ममता अंजनकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी संसंस्थेच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.