Published On : Tue, Mar 16th, 2021

कोरोना चाचणी तपासणीसाठी नगरसेवक यांचा पुढाकार

कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भाव नियंत्रण करण्यासाठी स्थानिक प्रशासन तारेवरची कसरत करीत आहे

या पाश्वरभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नागरीकानीं कोरोना चाचणी तपासणी कडे वेध घालणे गरजेचे आहे तेव्हा नागरिकाना कोरोना तपासणी साठी परावृत्त करणेसाठी कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष व प्रभाग क्र 10 चे विद्यमान नगरसेवक काशिनाथ प्रधान यांनो पुढाकार घेत दुर्गादेवी नगर येथे आज कोविड तपासणी शिबिराचे आयोजन करून खुद्द स्वतःची कोरोना चाचणी तपासणी करून घेतली.

यांवर प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक काशीनाथ प्रधान यांनी केलेल्या कोरोना चाचणी तपासणी ला परावृत्त होऊन बहुतांश नागरीकानी कोरोना चाचणी तपासणी कडे कल वाढवला..