Published On : Thu, May 6th, 2021

मनपाचे केन्द्रीय नियंत्रण कक्ष (सेन्ट्रल कंट्रोल रुम) सुरु

Advertisement

मनपा आयुक्तांनी केली पाहणी


नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासना तर्फे सेन्ट्रल कंट्रोल रुम मनपाच्या छत्रपति शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या माळयावर सुरु करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांसाठी विविध कोव्हिड रुग्णालयांमध्ये खाटांची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विविध कोव्हिड रुग्णालयांमध्ये रेमडीसिवीर, ऑक्सीजन पुरवठयाकरीता देखील वेगळा नियंत्रण कक्ष स्थापीत करण्यात आला आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी कंट्रोल रुमची पाहणी करुन येथे काम करणा-या कर्मचा-यांचे उदबोधन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. शिरीष पांडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा, श्री. राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, उपायुक्त श्री. महेश धामेचा, श्री. महेश मोरोणे व सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

मनपा मुख्यालयात सुरु करण्यात आलेली ही कंट्रोल रुम २४ तास सुरु राहणार आहे. येथे मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात तीन शिफ्टमध्ये तज्ज्ञांची चमू उपलब्ध असेल. आता कोणत्याही शासकीय रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात (80% क्षमतेत) अतितातडीचे रुग्ण वगळून थेट रुग्णाला दाखल करता येणार नाही. कंट्रोल रुममधून बेड अलॉट झाल्यानंतरच रुग्णाला दाखल करता येईल. शिवाय कंट्रोल रुममधून पाठविण्यात आलेल्या कोणत्याही रुग्णांना दाखल करण्यास हॉस्पीटलला नकार देता येणार नाही. हॉस्पीटलमध्ये आयसीयू बेड नसले तरीही रुग्णांवर प्रथमिक उपचार सुरु करता येईल.

Advertisement

कंट्रोल रुममधून उपलब्धतेनुसार तातडीने बेड उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील व जेथे बेड उपलब्ध झाला तेथे रुग्णाला ट्रान्सफर केले जाईल. कंट्रोल रुममधून बेडच्या उपलब्धेसंदर्भात सातत्याने माहिती घेतली जाईल. फोन च्या माध्यमातून कंट्रोल रुमशी संपर्क करता येईल. टेलिफोन क्रमांक ०७१२ – २५६७०२१ (१० लाईन उपलब्ध करण्यात आले आहे.) तसेच व्हॉटसॲपचे माध्यमातून रुग्णांची विविध माहिती ७७७००११५३७, ७७७००११४७२ या नंबरवर पाठवता येईल. रुग्णांची माहिती दिल्यानंतर रुग्णाचा SPO2 लेवल, एचआरसीटी, आरटीपीसीआर रिपोर्ट या क्रमांकावर व्हॉटसॲपवर पाठविता येईल. यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीने लवकरात-लवकर रुग्णालयात उपलब्धतेनुसार बेड उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. संबंधीत हॉस्पीटलला देखील याची पूर्वसूचना दिली जाईल.

अतिगंभीर स्वरुपातील कोव्हिड रुग्ण दाखल केल्यास एक तासाच्या आत कंट्रोल रुमला याबाबत माहिती देणे संबंधीत रुग्णालयास बंधनकारक राहील. तथापी या सवलतीचा दुरुपयोग केल्याचे लक्षात आल्यास संबंधीत हॉस्पीटल आणि संबंधित डॉक्टरवर कारवाईस पात्र राहील, असाही इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. या केन्द्राच्या संचालनमध्ये श्रीमती निरजा पठानिया यांची स्वंयसेवी संस्था व्ही ७ केयर फाऊंडेशन चे सहकार्य मिळत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.