Published On : Wed, Feb 16th, 2022
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या परिवहन विभागाचा ३८४.१३ कोटीचा अर्थसंकल्प समितीला सादर

Advertisement

पर्यावरणपूरक ई-बसेस होणार ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सन २०२१-२२ चा सुधारित व २०२२-२३ चा प्रस्तावित अर्थसंकल्प ‘ब’ परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्याकडे सोपविला. सन २०२१-२२ च्या सुधारीत वार्षिक अर्थसंल्पीय अंदाजात सुरूवातीची शिल्लक धरून १७८.०८ कोटी उत्पन्न अपेक्षित असून १७७.९० कोटी खर्च अपेक्षित राहिल.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंगळवारी (ता. १५) मनपा मुख्यालयातील परिवहन समिती सभापतींच्या कक्षात परिवहन समितीची सभा व्‍हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. यावेळी परिवहन व्‍यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सदर अर्थसंकल्प समितीला सादर केला.

बैठकीत परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, सदस्या रूपा राय, सोनाली कडू, सदस्य नितीन साठवणे, नागेश मानकर, शेषराव गोतमारे, परिवहन व्‍यवस्थापक रवींद्र भेलावे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम व जनसंपर्क अधिकारी अरूण पिंपरूडे, स्थापत्य उप अभियंता केदार मिश्रा, स्वीय सहायक तथा यांत्रिकी अभियंता योगेंद्र लुंगे आदी प्रत्यक्ष तर ऑनलाईन माध्यमातून समिती सदस्य राजेश घोडपागे, सदस्या विशाखा बांते, रूपाली ठाकूर आदी उपस्थित होते.

Advertisement

परिवहन व्‍यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, परिवहन सेवेच्या परिचालनाकरिता ‘शहर परिवहन निधी’ तसेच महसुलाच्या जादा शिल्लकीचा विनीयोग करण्याकरिता ‘महसूल राखिव निधी’ या नावाने स्वतंत्र शिर्ष उघडण्यात आलेले असून ‘परिवहन सुधारणा निधी’ सुद्धा स्थापन करण्यात आलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून आपली बसचे दैनंदिन प्रवाशी संख्या अंदाते ७१हजार असून दैनिक बसेसच्या ४६०० फे-या सुरू आहेत. सद्यस्थितीत डिझेल, सीएनजी स्टँडर्ड बसेस १७२, मिडी बस १४१, मिनी बस ४२ आणि इलेक्ट्रिकवरील महिलांच्या तेजस्विनी बसेस ६ अशा एकूण ३६१ बसेसचे संचालन सुरू आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलम्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मनपाच्या ताफ्यात १५ इलेक्ट्रिक मिडी बसेसचा समावेश होणार आहे.

तसेच १५व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत २०२०-२१ करिता ५१.६८ कोटी, २०२१-२२ करिता २५.८४ कोटी असे एकूण ७७.५२ कोटी निधी मंजुर करण्यात आलेला असून २०२२-२३ करिता २७.४० कोटी निधी देखील मंजुर करण्यात आलेला असून एकूण मंजुर निधी १०४.९२ कोटी निधी पैकी वाठोडा येथील डेपाच्या कामाकरिता ०८.कोटीची तरतूद वगळता ९६.९२ कोटीची तरतूद इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी करण्यात आलेली आहे.

२०२२-२३ पर्यंत १०४.९२ कोटी मधून २३३ मिडी बसेस खरेदी करणे प्रस्तावित असून २०२१-२२ पर्यंत प्राप्त ७७.५२ कोटी मधून पहिल्या टप्प्यात ११५ इलेक्ट्रिक बसेसे वेटलिजवर खरेदी करण्यात येणार आहे. दुस-या टप्प्यात प्राप्त निधीतून अंदाजे १०० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणे प्रस्तावित आहे. यातून २०२२-२३ या वर्षात नागपूर शहरात ‘आपली बस’च्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी ५०टक्के बसेस या इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावतील, असा विश्वासही यावेळी परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी व्यक्त केला. तसेच वाठोडा येथील १० एकर जागेवर नवीन डेपो तयार करण्यात येणार आहे.

यावर्षात १४५ कोटीची मागणी
परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात २०२२-२३ या वर्षाकरिता १४५ कोटी निधीची मागणी केली आहे. मनपाला आतापर्यंत प्राप्त् होत असलेल्या १०८ कोटी अनुदानात ३७ कोटी ज्यादा निधी आवश्यक असून २०२२-२३च्या अंदाजपत्रकात १४५ कोटी रुपये निधीची मागणी करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केल.

मार्चपर्यंत मिळणार १५ इलेक्ट्रिक मिडी बसेस
नागपूर महानगरपालिकेतर्फे १०० इलेक्ट्रिक असेसच्या संदर्भात केंद्र शासनातर्फे मंजुरी प्राप्त झालेली आहे. शहर बस सेवेत येणारा दैनंदिन तोटा लक्षात घेत्या इलेक्ट्रिक बसेसे खरेदी करीता केंद्रा शासनाकडून प्राप्त होणा-या अनुदानात मनपावर पडणारा अतिरिक्त बोजा लक्षात घेता तुर्तास ४० इलेक्ट्रिक मिडी बसेस खरेदी करण्यात येत असून ४० मिडी बसेसपैकी १५ बसेस मार्च २०२२ पर्यंत शहर बस सेवेत दाखल होणार आहेत, असेही परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी यावेळी सांगितले. आतापर्यत ७० डिजेल बसेसचे सी.एन.जी.मध्ये रूपांतरण करण्यात आले आहे. गर्दीच्या मार्गावर आवश्यकतेनुसार जास्तच्या बस सेवा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Advertisement
nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime  #CCTV #LatestNews #newsupdate

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges