Published On : Tue, Feb 8th, 2022
By Nagpur Today Nagpur News

प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकानांवर मनपाची कारवाई

Advertisement

नागपूर : प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दुकान, प्रतिष्ठानांविरोधात मनपाने कारवाई अधिक कठोर केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे.

सोमवारी (ता.८) धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ येथील मुस्कान शुज शॉप वर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय पथकाद्वारे गांधीबाग झोन अंतर्गत बडकस चौक येथील रोकडे ज्वेलर्स, गजानन खेत येथील गुरुनानक प्लास्टिक आणि हंसापूरी येथील लोकल प्लास्टिक या दुकानावर कारवाई करून २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपाद्वारे दररोज मनपा कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे जवान प्रत्येक बाजारपेठेत, भाजी मार्केट आणि अन्य ठिकाणी प्लास्टिक पिशवीचा उपयोग करणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.

कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनीष नगर येथील हॉटेल अशोक इम्पेरिअरवर कारवाई करीत उपद्रव शोध पथकाने २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने सोमवारी ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.