Published On : Fri, Mar 27th, 2020

Coronavirus Nagpur Update: नागपुरात एकाच कुटुंबातील चारजण पॉझिटिव्ह

नागपूर: उपराजधानीतील एकाच कुटुंबातील चार जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ९ झाली आहे. विदर्भाती एकूण संख्या १४ असून तीत गोंदिया १, यवतमाळ ४ असे रुग्ण आहेत.

कोरोनापासून संरक्षण मिळावे म्हणून शासनपातळीवर शर्थीचे प्रयत्न होत आहेत. नागरिकांच्या मनातही कोरोनाबाबत पुरेशी जागरुकता व धास्ती आली आहे. तथापि, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसते आहे. तर दुसरीकडे नागपुरातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण हा बरा होऊन घरी परतला असल्याचेही आशादायक चित्र आहे.