Published On : Mon, Sep 14th, 2020

शंभर टक्के हजेरीवर कोरोनाचा प्रवास ?

परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणात उपस्थिती,बस स्थानकावर वाढतेय गर्दी

नागपूर-  कोरोनाचा उद्रेक झाला असून बाधितांसोबतच मृतांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने काही नियमावली आखून दिली असून कार्यालयीन उपस्थितीही ३० टक्के एवढी ठेवण्याचे निर्देश दिले. मात्र, परिवहन महामंडळच्या विभागीय कार्यालयात शंभर टक्के कर्मचाèयांची उपस्थिती आहे. आधीच कोरानामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला तर काही कर्मचारी बाधित आहेत. अशा वेळी शंभर टक्के हजेरीवर कोरोनाचा प्रवास, अशी चर्चा आहे.

आधीच परिवहन महामंडळ आर्थिक संकटात. त्यात टाळेबंदीमुळे लालपरीचे चाके थांबल्याने पुन्हा संचित तोटा वाढत गेला. आता हळूहळू जनजीवन रुळावर आले आणि लालपरी धावायला लागली. मात्र, उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज हजाराच्या वर बाधितांची संख्या पुढे येत आहे. विशेष म्हणजे ५० च्या जवळपास मृत्युचा आकडा येत आहे. राज्य, केंद्र आणि स्थानिक स्वरांज्य संस्थेच्या कार्यालयात बाधित कर्मचाèयांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत शंभर टक्के कर्मचाèयांची उपस्थितीत कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढविण्यात महत्वाची भूमीका बाजावत असल्याचे स्पष्ट होत आहे.


नागपूर विभागात ग्रामीण -४ आणि शहर -४ अशी एकूण ८ आगार आहेत. जवळपास ५८० बसेस आहेत. यात ११ हजार कर्मचारी आहेत. चालक आणि वाहक वगळल्यास इतर कर्मचाèयांचे काय? वर्कशॉपमध्ये दुरूस्ती करताना एकमेकांशी संपर्क येतोच. याशिवाय कार्यालयीन काम करतानाही संपर्क येतो. अशा वेळी स्वत ला कीती वेळ सुरक्षित ठेवता येईल, असा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित होत आहे.

चालक वाहक २५ टक्के
बस व्यवस्था पूर्णपणे सुरू झाल्याने २५ टक्के चालक – वाहकांची संख्या २५ टक्के तर कार्यालयीन कर्मचाèयांची संख्या १०० टक्के आहे. वर्कशॉपमध्येही १०० टक्के उपस्थिती  आहे. कारण कमी कर्मचाèयात काम शक्य नाही. कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुखाच्छादन, निर्जंर्तुकीकरण आणि भौतिक अंतर आदी शासनाचे नियम पाळले जात आहेत. असे विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांनी सांगितले.