Published On : Fri, Sep 18th, 2020

कोरोना रुग्णांना डॉक्टरांकडून दूरध्वनीवर समुपदेशन

मनपा-आयएमएचा पुढाकार : होम आयसोलेशनमधील रुग्णांनी घ्यावा लाभ

नागपूर,: लक्षणे नसलेल्या कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांना आता होम आयसोलेशनचा पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला आहे. मात्र या काळात उपचाराविषयी अथवा प्रकृतीविषयी अनेक प्रश्न रुग्णांच्या मनात उपस्थित होतात. त्याची उत्तरे मिळण्यासाठी आणि समुपदेशनासाठी नागपूर महानगरपालिका आणि आयएमएने पुढाकार घेऊन शहरातील नामांकित डॉक्टरांकडून समुपदेशनाची व्यवस्था केली आहे.

Gold Rate
24 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,000 /-
Gold 22 KT ₹ 1,06,000 /-
Silver/Kg ₹ 1,35,700/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना डॉक्टर दूरध्वनीवरून संपर्क करतील. रुग्णांनी या व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर श्री संदीप जोशी, मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. आणि आरोग्य समिती सभापती श्री वीरेंद्र कुकरेजा यांनी केले आहे. जवळपास १०० डॉक्टर दररोज आपली सेवा देणार आहे.

विशेष म्हणजे, नागपूर महानगरपालिका आणि आयएमएने डॉक्टरांना गृह विलगीकरण मध्ये असलेले ५० वर्षावरील कोरोना हाय रिस्क पॉझिटिव्ह रुग्णांची यादी तयार करून दिली आहे. प्रत्येक डॉक्टर दररोज दहा रुग्णांशी संपर्क करेल आणि त्यांचे टेलीसमुपदेशन केले जाईल. हे समुपदेशन पूर्णपणे नि:शुल्क राहील. डॉक्टरांचा वेळ अमूल्य असल्यामुळे कोरोना रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

समुपदेशन करणारे डॉक्टर रुग्ण कोरोनामुक्त होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार आहेत, ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री जलज शर्मा यांनी दिली. त्यांनी सांगितले की या सेवेचा रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. या विषयावर निर्णय घेण्याकरिता आरोग्य समिती सभापती श्री. कुकरेजा यांनी बैठकीचे आयोजन केले होते. आय एम ए आणि मनपा चे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते.

विशेष म्हणजे अशा रुग्णांसोबत भविष्यात व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातूनही संवाद साधण्यात येईल. सध्या होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने नागपूर महानगरपालिका आणि आय.एम.ए. च्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’ हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम दररोज दुपारी २ वाजता करण्यात येतो. यामध्ये माहितीसोबतच रुग्णांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही दिली जात आहेत.

Advertisement
Advertisement