Published On : Fri, Dec 29th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात कोरोनाचे थैमान; ८ बाधित रुग्णांची नोंद तर ११ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु !

Advertisement

नागपूर : शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून गुरुवारी 8 नवीन कोरोना ररुग्णांची नोंद झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. त्यानुसार डिसेंबर महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे. त्यापैकी 11 सक्रिय रुग्ण आहेत. इतर ५ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर कोरोनाच्या नवीन व्हेरियंट जेएन.१ साठी आरोग्य विभाग सज्ज आहे.

नागपुरात नवीन व्हेरियंटचा एकही रुग्ण अद्यापही आढळला नाही. मात्र कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची झोप उडाली आहे. रुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये चार पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये लक्ष्मी नगर, धरमपेठ आणि हनुमानगड झोनमधील प्रत्येकी 3 आणि नेहरू नगर धंतोली झोनमधील प्रत्येकी 1 असे एकूण 11 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाला घाबरू नका आणि सुरक्षा नियमांचे पालन करा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

नागपूर महापालिका सतर्क :
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना आणि वृद्धांना लसीचे बूस्टर डोस दिले जात आहेत. महापालिकेच्या पाच रुग्णालयांमध्ये प्रथमोपचाराची सुविधा तयार करण्यात आली आहे. लवकरच आयसोलेशन युनिट तयार करण्यावरही विचार केला जात आहे. महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या प्रभाकरराव दटके हॉस्पिटलमध्ये शनिवारी आणि शुक्रवारी मेडिकल कॉलेजमध्ये बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.