Published On : Fri, Aug 5th, 2022

कोरोना ने निराधार महिलांना मा. राजेंद्र मुळक व्दारे शिलाई मशीन वाटप.

नांदगाव च्या मुले व युवकाकरिता पावर जिम साहित्य वाटप.

कन्हान : – कोरोना काळात निराधार झालेल्या ग्रा प नांदगाव येथील दोन महिलांना स्वावलंबी करण्याकरि ता मा. राजेंद्रजी मुळक यांनी सामाजिक बांधिलकी जपत भाऊ साहेब मुळक प्रतिष्ठाण च्या उपक्रमांतर्गत शिवणयंत्र (शिलाई मशीन) भेट देत गावातील मुले, युवकां च्या विकासाच्या दुष्टीने पावर जिम चे साहित्य वाटप करण्यात आले.

Advertisement

गुरूवार (दि.४) ऑगस्ट ला ग्राम पंचायत नांदगाव येथे माजी मंत्री तथा नागपुर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. राजेंद्र मुळक यांच्या सामाजिक बांधिलकी जपत भाऊ साहेब मुळक प्रतिष्ठाण च्या उपक्रमांतर्गत कोरोना काळात कुंटुबांचा कर्ता पती दिवंगत झाल्याने निराधार झालेल्या शारदा संजय धुवेॅ व प्रिया नंदकिशोर काळसर्पे या दोन महिलांना परिवा राच्या पालन पोषणाकरिता स्वयंरोजगार करून स्वाव लंबी व सक्षम बनविण्याकरिता जि प सदस्या अर्चना ताई भोयर, पं स सदस्या मंगलाताई निंबोणे, पारशिव नी उपसभापती चेतन देशमुख यांच्या हस्ते शारदा धुर्वे व प्रिया काळसर्पे या दोन महिला लाभार्थींना शिवण यंत्र (सिलाई मशिन) चे वाटप करण्यात आले.

Advertisement

तसेच नांदगावातील मुले व युवकांना शरीरयष्टी बनविण्यास व्यायाम करण्याकरिता पावर जिम चे साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी दिपकजी भोयर, देवरावजी ठाकरे, रामभाऊ ठाकरे, डुमनजी चाकोले, धीरज भोत मांगे, चेतन ठाकरे, अशोक रच्छोरे‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌, तुषार ठाकरे, राज ठाकरे, विक्की ठाकरे सह कॉग्रेस पदाधिकारी, कार्यक र्ते, ग्रामस्थ व महिला मंडळाच्या महिला आवर्जुन उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement