Published On : Mon, Oct 5th, 2020

कोरोना संकटात गरिबांना मदत ही आपली राष्ट्रीय जबाबदारी : नितीन गडकरी

Advertisement

प्रभाव-2020 मध्ये मार्गदर्शन

नागपूर: कोरोनाच्या जागतिक संकटाचा सामना सर्वच क्षेत्र करीत असताना समाजातील सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या गरीब लोकांना मदत करणे व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे ही आपली राष्ट्रीय जबाबादारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Advertisement

प्रभाव-2020 या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ना. गडकरी बोलत होते. कोरोनासोबत जगण्याची कला आपण विकसित केली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले- समाजातील सर्वच क्षेत्रांसमोर अनेक आव्हाने उभी झाली आहेत. आर्थिक युध्दाचा सामनाही करावा लागत आहे. कोरोना या संकटाबद्दल भीती आणि नैराश्य समाजात पसरले असताना सकारात्मकता व आत्मविश्वास निर्माण करणे आमची सामाजिक जबाबदारी आहे. अनेक कार्यकर्ते, सामाजिक संघटना सामाजिक जाणिवेतून व सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून काम करीत आहेत. आपणही या समाजाचे एक भाग आहोत, या भावनेतून संकटात असलेल्या समाजाला मदत करणे आपले कर्तव्य समजले पाहिजे, असेही ना. गडकरी म्हणाले.

या सोबतच कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या गरिबांसमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. रोजगार आणि भूक या गंभीर समस्या त्यांच्यासमोर उभ्या आहेत, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- या समस्येतून गरीब समाजाला बाहेर काढण्यासाठ़ी रोजगार निर्मितीची साधने शोधून बेरोजगारांना काम देता आले पाहिजे.

ज्ञानाचे आणि कचर्‍याचे संपत्तीत रूपांतर करता आले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्य, विज्ञान, यशस्वी प्रयोग, उद्यमशिलता याचा उपयोग करून संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेला आपण सावरले पाहिजे. राजकारणाचा उपयोग सामाजिक आणि आर्थिक सुधारणांसाठी केला जावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement