Published On : Mon, Jul 10th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावरून पेटला वाद ; जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख यांचे छायाचित्र हटविले !

Advertisement

नागपूर : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर पक्षात गटबाजीचे सत्र सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर नागपुरात राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावरून मोठा वाद पेटला आहे.

अजीत पवार यांच्या पक्षाचे कार्यालय, बजाजनगर येथील वासवी लॉन असेल, असे सांगून पक्षाचे नवनियुक्त प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांनी आधीपासून लावलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे छायाचित्र काढले. यामध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख यांच्या छायाचित्राचा समावेश आहे. मात्र, शरद पवार यांचा फोटो कार्यालयात ठेवण्यात आला आहे.

राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर बोलतांना प्रशांत पवार म्हणाले की, पक्षात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यात येत असून महापालिका निवडणुकीची तयारीही केली जात आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे लवकरच नागपुरात येतील. त्यांच्या हस्ते पक्ष कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

विदर्भातून प्रशांत पवार यांना अजित पवार गटाचे प्रवक्ते बनवण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, सतीश शिंदे, ईश्वर बाळबुधे, अरविंद भाजीपाले, भागेश्वर फेंडर, राजेश माटे आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.