Published On : Thu, Dec 15th, 2022
By Nagpur Today Nagpur News

फ्रान्सचे कौंसिल जनरल जेन मार्क सेरे शेवरले यांची मनपाला भेट

Advertisement

मनपा आयुक्तांशी नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पावर चर्चा

नागपूर : कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई जेन मार्क सेरे शेवरले (Jean Marc SereCharlet) यांनी बुधवारी (ता.१४) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी त्यांचे तुळशीचे रोपटे आणि मनपाचा मानाचा दुपट्टा देउन स्वागत केले.

Gold Rate
23 July 2025
Gold 24 KT 1,00,900 /-
Gold 22 KT 93,800 /-
Silver/Kg 1,16,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहामध्ये कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई जेन मार्क सेरे शेवरले यांच्याशी आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी शहरातील नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासंदर्भात चर्चा केली. याप्रसंगी लिओनेल गोमेरिक, कौंसिल जनरल ऑफ फ्रान्सचे प्रतिनिधी श्री. अभय टिकेकर, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, एनएसएससीडीसीएल चे महाव्यवस्थापक राजेश दुफारे, नाग नदी प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मोहम्मद इसराईल, स्मार्ट सिटीचे डॉ. पराग अरमल आदी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्तांनी नागपूर शहराविषयी माहिती दिली. नागपूर शहर हे देशातील ऐतिहासिक शहर असून शहराच्या मध्यभागातून वाहणारी नाग नदी हे शहराचे वैभव आहे. कालाच्या ओघात नदीचे सौंदर्य बाधित झाले. त्यामुळे या नदीच्या पुनरूज्जीवनासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाच्या कोनशिलेचे नुकतेच देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत नदीच्या सौंदर्यीकरण कार्यासाठी एजेन्सी फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी)चे मोठे सहकार्य लागणार आहे. संपूर्ण प्रकल्प दोन टप्प्यात असून प्रदूषण आटोक्यात आणने हे प्रकल्पाचे प्राधान्य कार्य आहे. यापुढे रिव्हर फ्रन्ट डेव्हलमपेंटचे कार्य केले जाणार आहे. या संपूर्ण कार्यात फ्रान्सचे मोठे सहकार्य मनपाला आवश्यक असल्याचे मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

याशिवाय शहरात अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार होत असून या कार्यातही फ्रान्सद्वारे आर्किटेक्चर आणि नगर विकासासंबंधी नियोजनाबाबत तांत्रिक सहकार्य मिळाल्यास त्याचाही शहराला भौतिक आणि महसूलात्मक दृष्ट्या फायदा होउ शकेल, अशी अपेक्षाही आयुक्तांनी व्यक्त केली.

कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई जेन मार्क सेरे शेवरले यांनी नागपूर शहरात पहिल्यांदाच येत असल्याचे सांगत शहराविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. स्मार्ट सिटी प्रकल्प, नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाची माहिती घेताना त्यांनी अडचणी जाणून घेतल्या. नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भातही त्यांनी पुढील कार्यवाहीच्या अनुषंगाने चर्चा केली.

Advertisement
Advertisement