Published On : Mon, Jun 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर शहरात होणार 15 व्हर्टिकल गार्डनची उभारणी

- नाल्यातील प्रदूषणावर आळा बसणार तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार
Advertisement

नागपूर ः शहरातील नागनदी, पोहरा नदी व इतर मोठ्या नाल्यांवरील पुलाच्या संरक्षक भिंतींवर शहरात विविध ठिकाणी १५ व्हर्टिकल गार्डन उभारण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. तसेच नाल्यातील प्रदूषणाला आळा बसण्यास उपयोगी ठरणार आहे.

नागपुर शहरातील विविध ठिकाणहून नागनदी, पोहरा नदी व मोठे नाले वाहत असल्याने मुख्य रस्तावर पुलांचे बांधकाम करून पॅरापेट वॉल बांधलेली आहे. मुख्य रस्त्याच्या नाल्याच्या संरक्षक भिंतीवरून नागरिक कचरा नाल्यात फेकत असल्याचे निदर्शनास आले आहे. नाल्यामध्ये नागरिकांनी कचरा फेकू नये तसेच मुख्य रस्त्यालगत नाल्यांचे सौंदर्यीकरण करून रस्ता सुशोभित दिसावा या करीता व्हर्टिकल गार्डन तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.

या कामास ५ कोटी १० लाख ७३ हजार ६७० रुपये खर्च अपेक्षित आहे. व्हर्टिकल गार्डन मध्ये मध्ये प्रामुख्याने रिहो प्लांट, जेड प्लांट, पेंडानस प्लांट, पर्पल हार्ट प्लांट व विडेलिया प्लांट या प्रजातीचे झाडे/रोपे लावून वेगवेगळी डिजाईन तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी करण्यात येणाऱ्या व्हर्टिकल गार्डन करिता सुरक्षेच्या दृष्टीने समोरच्या भागाला जाळी लावण्यात येईल. शहरात १५ ठिकाणी व्हर्टिकल गार्डन उभारण्याच्या कामाला महानगरपालिकेने प्रशासकीय मान्यता दिलेली असून, लवकरच निविदा बोलावून हे काम करण्यात येणार आहे.या निर्देशानुसार मुख्य रस्त्यावरील नाल्यांची पाहणी करून शहरातील विविध भागातील 15 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

येथे उभारण्यात आले गार्डन

Advertisement

1) अजनी चौक वर्धा रोड,

2) सोमलवार खामला स्कूल सहकार नगर घाटच्या मागे,

3) शंकर नगर नाला शंकर नगर पोस्ट ओफिसच्या बाजूला,

4) यशवंत स्टेडीयम ब्रिज जवळ नागनदी,

5) नरेंद्र नगर चौक ब्रिज,

6) चिंचभवन नाला वर्धा रोड,

7) रेशीमबाग चौक मेहेंदी लॉन जवळ,

8) नागनदी ब्रिज जुनी शुक्रवारी रोड,

9) मानेवाडा रिंग रोड

10) रामबाग नाला बैद्यनाथ चौक,

11) सरदार पटेल रोड,

12) गंगाबाई घाट जवळील जगनाडे चौक नाला,

13)ओंकार लॉन दिघोरी,

14) अशोक चौक आशीनगर नाला,

15) जाफर नगर पलोटी स्कूल

या जागांचा समावेश आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.