Published On : Mon, Nov 26th, 2018

मनपाच्या सर्व शाळा व झोन कार्यालयात संविधान दिन साजरा

Advertisement

नागपूर: भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्‍हावी व नागरिकांना संविधानाची ओळख व्‍हावी, या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेमध्ये दरवर्षी २६ नोव्‍हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करणयात येतो. त्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळा व झोन कार्यालयामध्ये संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून नागपूर महानगरपालेच्या सर्व शाळांमध्ये व झोन कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच शाळा व झोन परिसरात संविधान रॅली, निबंध स्पर्धा, संविधान लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदींचे आयोजन करून मोठ्या उत्साहापूर्ण वातावरणात संविधान दिवस साजरा करण्यात आला.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement