Published On : Sat, May 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

कर्नाटकात काँग्रेसचा विजय निश्चित, गरीबांच्या शक्तीने भांडवलदारांच्या ताकदीला हरवले : राहुल गांधी

Advertisement

नवी दिल्ली : कर्नाटकामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. २२४ जागांसाठी ही मतमोजणी होत असून काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरु झाली आहे. आतापर्यंत काँग्रेसला135 जागा मिळाल्या असून भाजपच्या पदरात 65 जागा आल्या आहेत. या अनुषंगाने काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित मनाला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

कर्नाटकची जनता, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता, पदाधिकारी, नेते आणि कर्नाटकमध्ये काम केलेल्या काँग्रेसच्या देशातील इतर नेत्यांचे मी अभिनंदन करतो. कर्नाटकमध्ये निवडणुकीत एकीकडे भांडवलशहांची ताकद होती आणि दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. गरीबांच्या शक्तीने भांडवलशहांचा पराभव केला, असे राहुल गांधी म्हणाले .

आम्ही कर्नाटकत्या गरीब जनतेला पाच आश्वासने दिली होती. आम्ही ही आश्वासने पहिल्या दिवशी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.