औरंगजेबाची कबर हटवण्याकरिता नागपुरात करण्यात आलेल्या आंदोलनाचा आधार घेऊन शहरातील काही समाजकंटकांकडून तरुणांची माथी भडकवण्यात आली. या दंगेखोरांमुळे शांत असणाऱ्या नागपुरात दंगलीची दुर्दैवी घटना घडली .
ही घटना घडल्यानंतर तातडीने शांतता प्रस्थापित करण्याची गरज असताना काँग्रेसचा एकही नेता त्यावेळी पुढे आला नाही , परंतु आज दंगलीला एक महिना पूर्ण होत असताना काँग्रेसला जाग आली आहे.
सद्भावना रॅली काढून राजकीय पोळी भाजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसचे नेते करत आहेत . या दंगलीमध्ये ज्या सामान्य नागरिकांच्या वाहनांचे , दुकानांचे आणि घरांचे कोट्यावधीचे नुकसान झाले, त्यांच्याबद्दल एकही शब्द काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला नाही.
आज झोपेतून जागे होऊन त्यांनी सद्भावना रॅली काढण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे मगरमच्छ के आसू असल्याचे नागपूरकरांना आता कळले आहे. काँग्रेस नेत्यांना हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. 500 पावले चालून कोटींचे नुकसान झालेल्या माणसाचे दुःख कळणार का? हा माझा काँग्रेस नेत्यांना सवाल आहे.
मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकारने दंगेखोरांवर कारवाई केली आहे , दंगलखोरांना आता त्यांच्याच भाषेत उत्तर मिळणार हे मात्र निश्चित.
शेवटी, जनता सब जानती है , एवढेच मी याप्रसंगी सांगेन.