Published On : Thu, Dec 28th, 2023
By Nagpur Today Nagpur News

काँग्रेस फुंकणार लोकसभेचे रणशिंग; ‘हैं तैयार हम’ महारॅली, परिवर्तनाचा संदेश देणार

Advertisement

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी नागपुरात ‘हैं तैयार हम’ ही महारॅली होत आहे. बहादुरा येथील ‘भारत जोडो मैदाना’वर दुपारी दोन वाजता होणाऱ्या या महामेळाव्यात काँग्रेस लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यसमितीचे देशभरातील नेते याप्रसंगी उपस्थित राहतील. रॅलीच्या आयोजनासाठी राज्यभरातील काँग्रेस नेते नागपुरात दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभास्थळी पत्रपरिषद घेत महारॅलीच्या आयोजनाची माहिती दिली. देशावर जेव्हा संकट येते तेव्हा नागपूरच्या भूमीतून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था व संविधान धोक्यात आहे. ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे.

महारॅलीतून परिवर्तनाचा संदेश दिला जाणार असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. जाती-धर्माच्या आडून लोकांमध्ये भांडणे लावून देश अधोगतीकडे नेला जात आहे. विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.