Published On : Mon, Feb 24th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार; आमदार विकास ठाकरेंचे विधान

Advertisement

नागपूर : येत्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आहे.नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, असे विधान आमदार आणि नागपूर जिल्हा (शहर) काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.

मुंबईत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक –
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आज राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता या बैठकीची सुरुवात होईल. तर मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी दुपारी १.३० वाजता रोजी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी-यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला आमदार विकास ठाकरे उपस्थित राहतील.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आमची तयारी स्वतंत्र लढण्याची –
पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर जिल्हा (शहर) काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आगामी नागपूर महानगरपालिका (एनएमसी) निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढण्यासाठी तयारी सुरु केल्याचे म्हटले आहे. मात्र शेवटी हायकमांड जे निर्णय घेतली तेच आम्हाला मान्य असले असेही ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे गटानंतर आता काँग्रेसने स्वबळाची नारा दिल्यानंतर महाविकास आघाडीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.