नागपूर: नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावलेले कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना आज उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी सुनील केदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी आज (मंगळवार, ७ जानेवारी) सुनावणी पार पडली.
सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. ज्यामध्ये एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





