Published On : Tue, Dec 23rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज; ४० ‘स्टार’ प्रचारक मैदानात

Advertisement

नागपूर: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने निवडणूक रणनिती अधिक तीव्र केली आहे. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीनंतर पक्षाने तब्बल ४० प्रमुख ‘स्टार प्रचारकांची’ यादी जाहीर करत निवडणूक प्रचाराला अधिक वेग दिला आहे. या यादीत राष्ट्रीय नेतृत्वासह राज्य व स्थानिक पातळीवरील प्रभावी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रचार मोहिमेचे नेतृत्व काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला करणार असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज आणि विधानपरिषदेतील गटनेते सतेज (बंटी) पाटील हे प्रमुख चेहरे प्रचारात सक्रिय असतील. राष्ट्रीय स्तरावरून खासदार मुकुल वास्निक, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे काँग्रेसच्या प्रचार सभांना धार देणार आहेत.

Gold Rate
23 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,36,300/-
Gold 22 KT ₹ 1,26,800/-
Silver/Kg ₹ 2,10,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बाळासाहेब थोरात, तेलंगणचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन, खासदार रजनीताई पाटील, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश असून, संघटनात्मक मजबुतीवर भर दिला जाणार आहे.

अल्पसंख्याक समाजाशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य नसीम खान हे प्रचाराची धुरा सांभाळतील. याशिवाय अभिनेता व काँग्रेस नेते राज बब्बर, यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम आणि भाई जगताप यांसारखे प्रभावी स्थानिक नेते प्रचारात रंगत आणणार आहेत.

तसेच अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार हुसेन दलवाई, साजिद खान पठाण, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आमदार मुजफ्फर हुसेन, एम.एम. शेख, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे आणि हनुमंत पवार यांचाही प्रचारक म्हणून समावेश आहे.

या ‘स्टार’ प्रचारकांच्या फौजेमुळे काँग्रेसची प्रचार मोहीम अधिक व्यापक आणि परिणामकारक ठरेल, असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे. महापालिका निवडणुकीत निर्णायक यश मिळवण्यासाठी पक्षाकडून उमेदवारांची अंतिम यादी आणि विशेष प्रचार अभियान लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement