नागपूर : पश्चिम नागपुरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वीज कपात आणि लोडशेडिंगमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भीषण उकाड्यात तासन्तास वीज गायब राहत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समर्थनार्थ आज काँग्रेसने महावितरण कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात बॅनर आणि फलक घेऊन राज्य सरकार तसेच महावितरण प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. “तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करा”, “लोडशेडिंग बंद करा” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.
पश्चिम नागपुरातील अनेक भागांमध्ये दिवसातून वारंवार वीज खंडित होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. वाढत्या तापमानात वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरगुती कामे, व्यावसायिक व्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने परिस्थिती सुधारली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला.
पश्चिम नागपुरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणकडून कोणतेही नियोजन दिसत नाही. उकाड्यात लोक अक्षरशः हैराण झाले आहेत. तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करेल, असे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे म्हणाले.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





