Published On : Sun, Jan 20th, 2019

काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती – मुख्यमंत्री

नागपूर : मुंबईतील इंदू मिलची जागा काँग्रेसला हडपायची होती, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूरमध्ये भाजपाच्या विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती. आपल्या बापाचे स्मारक उभे केले, पण संविधानाच्या बापाचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला नाही, शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 2020 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथील स्मारक पूर्ण होईल. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसने अनुसूचित जातींचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. परंतु आता तसे करणे काँग्रेसला शक्य होणार नाही, कारण आम्ही तसे होऊ देणार नाही. अनुसूचित जातींसाठी भाजपाने काम केले आहे.

Advertisement

याचबरोबर, देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपाने जनतेसाठी सौभाग्य योजना आणली. या योजनेद्वारे लोकांच्या घरोघरी वीज, एलईडी बल्ब पोहोचले. त्याशिवाय, उज्ज्वला योजनेद्वारे लोकांच्या घरी गॅस जोडणी आणि शेगडी उपलब्ध करुन दिली. ज्या घरांना या योजनांचा लाभ मिळाला त्यापैकी 60 टक्के घरं ही अनुसूचित जातींमधील लोकांची होती.

भाजपाच्या या विजय संकल्प सभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक भाजपाचे नेते उपस्थित आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement