Published On : Fri, Feb 16th, 2024
By Nagpur Today Nagpur News

काँग्रेसने पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली; पक्षाच्या बड्या नेत्याचा आरोप

Advertisement

नागपूर : काँग्रेसने पक्षाची त्यांची बँक खाती गोठवण्यात आल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष अजय माकन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचा आयकर विभागावर खाते गोठवल्याची माहिती दिली. आयकर विभागाने युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून 210 कोटी रुपयांची रिकव्हरी मागितल्याचा आरोप केला.

माकन म्हणाले- आम्हाला गुरुवारी माहिती मिळाली की बँकांनी पक्षाने दिलेले धनादेश थांबवले आहेत. ते आमचे चेक क्लिअर करत नाहीत. काँग्रेस पक्षाची खातीही गोठवण्यात आली आहेत. याशिवाय क्राउड फंडिंग खातीही गोठवण्यात आली आहेत.

सध्या आमच्याकडे वीज बिल भरण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. खाती गोठवल्यामुळे केवळ भारत जोडो न्याय यात्राच नाही, तर पक्षाच्या सर्व राजकीय घडामोडींवर परिणाम होणार आहे. हे लोकशाही गोठवण्यासारखे आहे, असेही मकान म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.