Published On : Tue, Apr 2nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर, कोल्हापूरात पाठींबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने अकोल्यात उतरविला उमेदवार !

Advertisement

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जवळ आल्याने महाविकास आघाडीने आपले अनेक उमेदवार जाहीर केले आहेत. तर उर्वरित मतदारसंघांच्या उमेदवारांची घोषणा अद्यापही करण्यात आलेले नाही. याचदरम्यान वंचितने ‘एकला चलो’चा नारा देत स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली. .त्यानंतर आता काँग्रेसनेही प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात अकोल्यामधून उमेदवार जाहीर केला आहे..

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेस समितीचे महासचिव असलेले डॉ. अभय पाटील यांना अकोला मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

नागपूर, कोल्हापूरसाठी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देऊनही काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या विरोधातच उमेदवार दिल्याने वंचित बहुजन आघडीच्या गोटात खळबळ उडाली. अकोला लोकसभेसाठी भाजपने खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे अकोल्यात आता तिरंगी लढत होईल.

दरम्यान काँग्रेसने घेतलेल्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.