Published On : Wed, Dec 21st, 2022
By Nagpur Today Nagpur News

नागपूर जिल्ह्यात काँग्रेस जोरदार मुसंडी भाजपचा पराभव.

Advertisement

नागपूर: अतिशय प्रतिष्ठेच्या आणि काट्याची लढत ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला असून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.

हाती आलेल्या २३६ ग्राम पंचायत निकाला पैकी काँग्रेस ९३, राष्ट्रवादी काँग्रेस ३७, शिवसेना १४, भाजपा ८७ व अपक्ष ०५ जागेवर विजयी झाले आहे.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कामठी, सावनेर, हिंगणा, उमरेड व काटोल या सहाही विधानसभा मतदार संघात या ग्राम पंचायत निवडणुका पार पडल्या. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मा.श्री. राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वाखाली व मा.आ.श्री सुनिलजी केदार, माजी मंत्री तसेच काँग्रेसचे सर्व नेते व कार्यकर्त्यानीं एकत्र येऊन जिल्ह्यात नेत्रदीपक यश प्राप्त केले.

जिल्ह्यातील बड्या-बड्या भाजप नेत्यांच्याच घरात भाजपचा दारुण पराभव झाल्याने नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. काँग्रेस कार्यकर्ते गावागावात प्रचंड उत्साहात जित साजरी करताना दिसत असून भाजप वर्तुळात मात्र चिंतेचे सावट दिसत आहे.

Advertisement

नागपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात विजयी झालेल्या सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्यांचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी अभिनंदन केले आहे. नागपूर जिल्ह्यातील जनतेचे काँग्रेस पक्षावर टाकलेल्या या विश्वासाबद्दल राजेंद्र मुळक यांनी सर्व जनतेचे, कार्यकर्तेचे व मतदाराचे हि आभार मानले आहेत.

Advertisement
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges