Published On : Sat, Jan 29th, 2022

Video: काँग्रेसच्या नगरसेवकाने ऑनलाईन सभेत ओढले सिगारेटचे झुरके

Advertisement

नागपूर: एजी, बीव्हीजी या दोन कंपन्यांचे काम समाधानकारक नसून येत्या तीन महिन्यांत नवीन कंपनीची नियुक्ती तसेच कंत्राट रद्द करण्याची शिफारस याआधी करण्यात आली. या अहवालावर चर्चेसाठी आज नागपूर (Nagpur)महापालिकची विशेष ऑनलाईन सभा घेण्यात आली होती. या सभेत काँग्रेस (Congress )नगरसेवक रमेश पुणेकर (Ramesh Punekar) यांनी सिगारेटचे झुरके मारले. शहरातील प्रश्नांवर चर्चा करत असताना चक्क नगरसेवकानीच असभ्य वर्तवणूक केल्यामुळे चर्चेला उधान आले आहे. या बैठकीला महापौर, महापालिका आयुक्त आणि नगरसेवक उपस्थित होते.

एजी, बीव्हीजी कंपन्यांच्या संदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्त्वात चौकशी समिती गठीत केली होती. या समितीने महापौरांकडे अहवाल सोपविला होता. याची चौकशी आजच्या बैठकित करण्यात येणार होती. नागरीकांशी निगडीत असणाऱ्या प्रश्नाला न्याय द्यायचे सोडून या सभेत काँग्रेसचे नगरसेवकच सिगारटचे झुरके ओढत बसले. या असभ्य वर्तवणूकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरी समस्यांचा प्रश्न एैरणीवर आला आहे. या सभेत अनेक मुद्दे समोर आले असून या दोन कंपनी आरोप झाले आहेत.