Published On : Thu, Apr 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

काँग्रेसचा दणका; संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी

Advertisement

नागपूर :काँग्रेस पक्षाविरोधात उघडपणे विधान करणारे माजी खासदार संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दुपारीच संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. निरुपम यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले आहे. संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला.

काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत संजय निरुपम यांना स्थान दिले होते. मात्र, संजय निरुपम मुंबईतील लोकसभेच्या एकूण सहा जागांपैकी चार जागा ठाकरे गटाला देण्यात आल्यामुळे सातत्याने नाराजी व्यक्त केली होती.ते सातत्याने महाविकास आघाडीच्या विरोधात विधाने करत होते. यानंतर नाना पटोले यांनी बुधवारी संध्याकाळी संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर संजय निरुपम यांनी एक ट्विट केले होते.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या खुर्च्या आणि उर्जेचा उपयोग पक्ष वाचवण्यासाठी करावा. अगोदरच काँग्रेस पक्ष भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मी काँग्रेस पक्षाला एक आठवड्याचा वेळ दिला होता, तो आज पूर्ण होत आहे.

उद्या मी स्वत: निर्णय जाहीर करेन, असे संजय निरुपम यांनी म्हटले होते.निरुपम यांच्या ट्विटमुळे ते काँग्रेसला राजीनामा देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र त्या अगोदरच काँग्रेस पक्षाने कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.

Advertisement
Advertisement