Published On : Mon, Jun 7th, 2021

नागोराव जयकर यांचे अभिनंदन

बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी, महाराष्ट्र प्रदेश प्रभारीद्वय एडवोकेट खासदार वीरसिंहजी, प्रमोदजी रैनाजी यांच्या दिशा निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एडवोकेट संदीपजी ताजणे यांनी *महाराष्ट्र प्रदेश महासचिव म्हणून नागोराव जयकर* यांची निवड केली. त्यामुळे बसपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

नागोराव जयकर यांनी यापूर्वी नागपूर जिल्हा अध्यक्ष, नागपूर जिल्हा प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली. आता पक्षाने त्यांना महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव म्हणून जबाबदारी दिली. त्यामुळे

महाराष्ट्र प्रदेश बसपाचे कार्यालयीन सचिव व प्रदेश मीडिया प्रभारी *उत्तम शेवडे* ह्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बसपा चे मनपा पक्षनेते *जितेंद्र घोडेस्वार* यांच्या प्रमुख उपस्थितीत नागोराव जयकर यांचे निवासस्थानी कार्यकर्त्यांद्वारा हा अभिनंदन कार्यक्रम पार पडला.

प्रीतम खडतकर ह्यांचा पक्षप्रवेश
या अभिनंदन सोहळ्या प्रसंगी दक्षिण नागपुरातील सावित्रीबाई फुले नगर निवासी, बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष युवा कार्यकर्ते प्रीतम खडतकर ह्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज बसतात प्रवेश केला. त्यांना बसपा नेते नागोराव जयकर, उत्तम शेवडे व जितेंद्र घोडेस्वार ह्यांनी गुलदस्ता, पक्षाचा दुपट्टा, पक्षध्वज व कांशीरामजीची पुस्तक भेट देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.

अभिनंदन करणाऱ्यात माजी जिल्हा प्रभारी राजकुमार बोरकर, माजी शहर प्रभारी योगेश लांजेवार, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, दक्षिण नागपूर अध्यक्ष नितीन वंजारी, प्रभारी शंकर थुल, मध्य नागपूर अध्यक्ष प्रवीण पाटील, मुकेश मेश्राम, माजी नगरसेवक सागर लोखंडे, पूर्व नागपूर अध्यक्ष जितेंद्र मेश्राम, महिपाल सांगोडे, राजू चांदेकर, हिंगणा महासचिव सुरेश मानवटकर, सुरेंद्र शेंडे, सुनील सुटे, रोशन शेंडे, वेनानगर सरपंच सतीश शेळके, सुधाकर सोनपिंपळे, नगरसेवक नरेंद्र मेंढे, अनिल साहू, गौतम सरदार, धनराज हाडके, वीरेंद्र कापसे, विलास मून, यादव साखरकर, नगरसेविका रमा गजभिये, रंजना ढोरे, सुरेखा डोंगरे, रंजना बाराहाते, हर्षवर्धन डोईफोडे, विजय मोखाडे, धर्मपाल गोंगले, विजय चिकाटे, राजेंद्र शंभरकर, संभाजी लोखंडे, प्रताप तांबे, सुमित जांभुळकर, सचिन मानवटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांचा प्रामुख्याने सहभाग होता.