Published On : Tue, Aug 27th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती परीक्षेत गोंधळ, परीक्षा रद्द करण्याची मागणी

Advertisement

नागपूर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरती परीक्षेदरम्यान गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे.

वाडी येथील केंद्रावर सोमवारी ऑनलाइन परीक्षा होती. येथे परीक्षेला बसलेल्या अनेक महिलांना योग्य कागदपत्रांअभावी परीक्षेला बसू दिले नाही, त्यानंतर उमेदवारांनी गोंधळ घातला.

जीएमसी हॉस्पिटल, नागपूरमध्ये अनेक पदांसाठी भरती करण्यात आली आहे. राज्यातील अनेक ऑनलाइन केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. वाडी येथे असलेल्या केंद्रावर महिलांना परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली.

मात्र यातील अनेक महिलांकडे योग्य कागदपत्रे नसल्याचे कारण देत परीक्षा देण्यापासून रोखण्यात आले.त्यानंतर उमेदवार महिलांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.