नागपूर : ‘माझ्या दोन्ही मुलांवर बाला यादवच्या मुलाने हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर मी धंतोली पोलीस ठाण्यात पोहचलो. तेथे मुलगा करण हा रक्तबंबाळ दिसला. पोलीस हवालदार सुभाष याने मला शिवीगाळ केल्यामुळे मीसुद्धा चिडून शिवीगाळ केली, असे भाजपचे वादग्रस्त नेते मुन्ना यादव यांने पत्रपरिषदेत सांगितले नुकताच धंतोली पोलिसांनी मुन्ना यादव आणि त्याची मुले करण आणि अर्जूनवर पोलिसांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे, धमकी दिल्याप्रकरण गुन्हा दाखल केला आहे.
मुन्ना यादव म्हणाले, शनिवारी रात्री दहा वाजता करण आणि अर्जून हे दोघेही घरात बसलेले होते. यादरम्यान, बाला यादवच्या मुलांसोबत वस्तीतील एका युवकाचा वाद झाला. त्याला मारण्यासाठी बाला यादवची मुले पाठलाग करीत होते. तो युवक माझ्या घरात शिरला. त्यांना विरोध करण्यासाठी करण-अर्जून मध्ये पडले. त्यामुळे चिडलेल्या बाला यादवच्या मुलांनी दोघांवरही तलवारीने हल्ला केला. त्यामुळे करणच्या डोक्यावर २७ टाके पडले तर अर्जूनचा हात मोडला.
हे प्रकरण धंतोली पोलीस ठाण्यात गेले. मी पोलीस ठाण्यात पोहचलो. मुलगा करण हा रक्तबंबाळ दिसला. त्याला पोलिसांनी त्याला पोलिसांनी पोलीस ठाण्याचा बाहेर उभे राहण्यास सांगितले. ‘पोलीस ठाणे तुझ्या बापाचे आहे का?’ असा प्रश्न विचारला. पोलीस हवालदार सुभाष वासाडे याला मी समजून सांगितले की, मुलगा रक्तबंबाळ आहे, त्याला रुग्णालयात घेऊन चला. त्यावर हवालदाराने मला शिवीगाळ केली. त्यामुळे मीसुद्धा चिडलो आणि पोलिसांना शिवीगाळ केली, अशी कबुलीच पत्रकार परिषदेत मुन्ना यादव यांनी दिली.
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...
फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews
नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...
उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...
व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam
ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...





