Published On : Mon, May 16th, 2022
By Nagpur Today Nagpur News

लहान मुलांवर मोबाईलचे अतिवापराने होणारे दुष्परिणाम मार्गदर्शन सत्र व कार्यशाळा संपन्न

Nagpur: असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्पलॉइज ऑफ इंडिया या संघटनेच्या नागपूर शाखा व दृष्टी महिला बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह मर्यादित सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रेवती नगर व बेसा परिसरातील नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी मोबाईलचे अतिवापराने होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय योजना या विषयावर मार्गदर्शन सत्र व कार्यशाळेचे आयोजन इरा इंटरनॅशनल शाळेच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी कमलेश पिसाळकर, मानसशास्त्रज्ञ जनरल हॉस्पिटल, वर्धा हे मुख्य मार्गदर्शक होते.

त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी मोबाईलचा प्रदीर्घ वापर, अनिद्रा, मोबाईलवर येणाऱ्या एस एम एस द्वारे फसवणूक प्रकरणे, प्रॉक्रॅस्टीनेशन (काम नेहमी पुढे ढकलणे), मोबाइलवर सतत वेबसिरिज पाहणे, फेसबुक वर रिल्स पाहणे असे शारीरिक व मानसिक परिणाम तसेच मोबाईल सतत पाहण्यामुळे उद्भवणा-या घातक परिणामांबाबत नागरिकांमध्ये जागृती केली. तसेच लहान मुलांमध्ये पब्जी गेममुळे लहान-मोठी मुले रात्रभर जागे राहणे आणि सतत बंदुक हातात असल्यासारखे अविर्भाव करणे, व यासारखे इतर मोबाईल गेम्स मुळे झालेले दुष्परिणाम याबाबत सुद्धा उपस्थित नागरिकांना माहिती देण्यात आली लहान व किशोरवयीन मुलांमध्ये पोर्नोग्राफी व्हिडिओ चे सतत पाहण्यामुळे त्यांच्या घरातील वागणुकीत होणारा बदल सर्व पालकांनी लक्षात घेतला पाहिजे व त्यावर उपाययोजना केली पाहिजे हे त्यांनी सविस्तरपणे सांगितले.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी दृष्टी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष संगीता अरुण चव्हाण यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. इरा इंटरनॅशनल शाळेच्या संचालिका अनिता पांडव या प्रामुख्याने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संचलन डॉ. विद्या किशोर मानकर यांनी केले. रेवतीनगर मधील नागरिक रायभान पाटील, सुनील जगदीश, गौतम शंभरकर, दीपा कोटांगळे, दिनेश दहिकर, अरुण चव्हाण, तसेच पतसंस्थेच्या संचालक श्री सरिताताई पाटील माया गोडे, सरल कोहचाडे व इतर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement