Published On : Mon, Jul 8th, 2019

महापालिका क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

नागपूर: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नागपूर महापालिका क्षेत्रात सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केल्या.

नागपूर महापालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महापालिका कामाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यात नावीन्यपूर्ण योजना, कौशल्य विकास योजना, पाणी पुरवठा, दलित वस्ती सुधार योजना यासह विविध योजनांचा समावेश होता. जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. महापालिका क्षेत्रात एकूण सर्व कामांचा सद्य:स्थितीचा अहवाल येत्या आठ दिवसात सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यात प्रत्येक ठिकाणी सुरू असलेल्या कामावर अधिकाऱ्यांनी जाऊन निरीक्षण करावे.

Advertisement

तसेच कामे पूर्ण किंवा अपूर्ण याबाबतचा स्पष्ट अहवाल तयार करावा. अपूर्ण असलेली कामे किती दिवसात पूर्ण करण्यात येतील, याबाबतची माहिती सादर करावी. प्रत्येक कामाचे छायाचित्र व चलचित्रीकरणासह माहिती द्यावी, अशा विविध सूचना त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीत अभियंता श्री. वासनिक, शिक्षणाधिकारी श्री. मिश्रीकोटकर, नगररचनेचे सहायक संचालक श्री. गावंडे, हनुमाननगर झोनचे अभियंता श्री. बाराहाते, पाणी पुरवठा अभियंता श्री. गणवीर, श्री. बॅनर्जी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.