Published On : Tue, Oct 12th, 2021

मेयो मधील सुलभ शौचालयाचे निर्माण कार्य तातडीने पूर्ण करा : महापौर दयाशंकर तिवारी

नागपूर: शहरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी सुलभ शौचालयाचे निर्माण करण्यात येत आहे. हे कार्य अनेक दिवसांपासून प्रलंबित असून त्यामुळे नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे सदर सुलभ शौचालयाचे कार्य लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात मनपातर्फे बांधकाम करण्यात येत असलेल्या सुलभ शौचालयाच्या कामाची महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी (ता.११) पाहणी केली.

यावेळी मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, डॉ. सागर पांडे, कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, अजय गौर, ब्रजभूषण शुक्ला आदी उपस्थित होते.