Published On : Thu, Aug 26th, 2021
By Nagpur Today Nagpur News

आशीनगर व मंगळवारी झोनमधील प्रलंबित कार्य तातडीने पूर्ण करा : राजेंद्र सोनकुसरे

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेंतर्गत आशीनगर झोन व मंगळवारी झोन येथील प्रलंबित कामांचा स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी आढावा घेतला. रखडलेले काम २०१९-२० पासून मंजुरी प्राप्त आदेश झालेले काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी आशीनगर झोनच्या सभापती वंदना चांदेकर, मंगळवारी झोनच्या सभापती प्रमिला मंथराणी व दोन्ही झोनचे नगरसेवक अधिकारी उपस्थित होते. त्यांनी आशीनगर झोनमध्ये कनिष्ठ अभियंताची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले.

बांधिल खर्चात आलेले काम, झोनल बजेट, फिक्स प्रायोरिटी, वॉर्डनिधी इत्यादी काम तत्परतेने मंजुर करण्यात यावे व दोन्ही झोन अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे झोनमधील नगरसेवकांनी सुचविले. आशीनगर व मंगळवारी झोन अंतर्गत व हॉट मिक्सतर्फे खड्डे बुजविण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी राजेंद्र सोनकुसरे यांनी दिले.

बाजार संदर्भात जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, गरिबांना रोजगार मिळेल यादृष्टीने शहरात काम करणे आवश्यक आहे. नागपूर शहरात अनेक मोबाईल टॉवर असून यापासून मनपाला उत्पन्न प्राप्त होत नाही. याची दखल घेऊन अधिकृत व अनधिकृत किती टॉवर आहेत याची माहिती समितीला सादर करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

आशीनगर झोनमध्ये कनिष्ठ अभियंता नसल्याने त्याबाबत प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवून झोनअंतर्गत प्रभागातील कामासाठी कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती करण्याचे त्यांनी निर्देशित केले. दोन्ही झोनचे सहायक आयुक्तांनी उपरोक्त सर्व कामासंदर्भात प्राधान्याने विशेष लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.