Published On : Fri, Jan 18th, 2019

हुड्केश्वर परिसर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी दिले निवेदन

15 दिवसांत कुठलीही कार्यवाही न केल्यास मोटारीया वाईन शॉप आणि देशी दारू दुकानांना ताला ठोको आंदोलन करण्याची दिली चेतावनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस दक्षिण नागपूर विधानसभा कार्याध्यक्ष

नागेश देडमुठे यांच्या नेत्रुत्वात* हुड्केश्वर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ निरीक्षक यांना दिले निवेदन आणि मागणी केली की ,बीजेपी चा गढ असलेल्या कामठी आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या हुड्केश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत*

हुड्केश्वर थानाअंतर्गत जास्त प्रमाणात वाढलेली गुन्हेगारीचे कारण असलेले हुड्केश्वर रोड वरील वाईन शॉप, देशी दारूचे दुकान तसेच बियर शॉपी यांवर प्रतिबंधक कार्यवाही करण्याबाबत

हुड्केश्वर थानाअंतर्गत सुरू असलेले प्राइड बार समोरील मोटारिया वाईन शॉप, तिथेच बाजूला असलेले देशी दारूचे दुकान आणि शाहू लॉन समोरील पँसीफीक बियर शॉपी खुले आम दारू विक्रीमुळे कमी वयोगटातील मुले दारूच्या अधीन होउन गुन्हेगारी कडे प्रव्रूत्त होत आहेत ,

तसेच वाईन शॉप, देशी दारू आणि बियर शॉप समोरच गैर तत्वाची लोक दारू पीत बसतात त्यामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे,


रोडवरील वाहतूकिस अडथळा निर्माण होत असून आई बहिणींची छेड काढली जाते , शिवीगाळ केली जाते त्यामुळे आजू बाजूला राहणाऱ्या सामान्य जनतेला याचा त्रास होत असून सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

याआधी काही महिन्यापूर्वी आपल्या थानाअंतर्गत मर्डर झाला तसेच काही महिन्या आधी बलात्काराची घटना घडली.आपल्या थानाअंतर्गत वाढलेल्या गुन्हेगारी मुळे येथील जनतेत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे ,मागील काही वर्षापासून अनेक अवैध कामे सुरू आहेत ,या अवैध कामात काही असामाजिक तत्वाचे लोक गुंतलेले आहेत ,याआधी काही महिन्यापूर्वी तसेच मागील दहा दिवसाआधी आपल्या थानाअंतर्गत मर्डर झाला तसेच दोन दिवसाआधी बलात्काराची घटना घडली.

आपल्या थानाअंतर्गत वाढलेल्या गुन्हेगारी मुळे येथील जनतेत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे ,आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या अवैध कामामुळे असामाजिक तत्वाचे लोक येऊन आपल्या परिसरात गुन्हे करतात,ही गुन्हेगारी थांबवण्यसाठी आपल्या परिसरात सुरू असलेले अवैध कामे बंद करावे आणि त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस ची मागणी आहे मा. साहेब आपणांस नम्र विनंती आहे की दिलेल्या निवेदनावरुन येत्या 15 दिवसांत कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी द्वारा रोड वर मोटारीया वाईन शॉप आणि देशी दारू दुकानांना ताला ठोको आंदोलन करण्यात येईल.

प्रामुख्याने उपस्थित रा.कां नागपूर शहर प्रवक्ता व माजी सभापती म.न.पा राजू भाऊ नागुलवार, माजी नगरसेवक अशोक भाऊ काट्ले रा.यु.कॉं नागपूर जिल्हा उपाध्यक्ष अमित भाऊ पिचकाटे , प्र , दक्षिण विधानसभा अध्यक्ष तौसीफ शेख , दक्षिण विधानसभा महासचिव शरद गंगात्रे ,मनीष वजरे समीर शेख , , विजय भाऊ देडमुठे, अक्षय बोबडे, प्रज्वल बोबडे , प्रभा ताई बांबल, शकुन ताई इंगोले , तुषार लुटे,तेजस पूसद्कर, निखिल कळंबे,तारकेश्वर प्रसाद , भूपेश चौरासे ,अक्षय चिमणकर , मीनाताई बुटके, लीलाबाई बल्की , भारतीताई पिपरे, अनिता ताई यादव , शारदाताई हरणे आकाश चिमनकर

आदी शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते