Published On : Sat, Apr 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

दही बाजार जागेची तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत विकास कामांची आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर : महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळातर्फे (एमएसआयडीसी) विकसित करण्यात येणाऱ्या प्रस्तावित दही बाजार जागेची तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत पारडी भागात होत असलेल्या विविध विकास कामांची पाहणी शनिवारी (ता. २६) महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली.

यावेळी नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. किरण राऊत, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता श्री. संजय माटे, कार्यकारी अभियंता श्री. पंकज पाराशार, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचेटवार, सहाय्यक आयुक्त श्री. विजय थूल व श्री. धनंजय जाधव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
May 14- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 159,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,000 /-
Silver/Kg ₹ 2,70,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुरात एमएसआयडीसी मार्फत विकसित करावयाच्या बाजारमध्ये इतवारी भागातील दही बाजारचा समावेश आहे. या ठिकाणी प्रस्तावित बांधकामामध्ये येणाऱ्या संभाव्य अडचणींची माहिती आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. या भागात झालेले अतिक्रमण हटविणे तसेच यूपीडीसीआरच्या तरतुदी लक्षात घेऊन आवश्यक रस्ता रुंदीकरण व बाजार इमारतीची उंची विचार घेऊन आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.


स्मार्ट सिटीअंतर्गत विकास कामांची पाहणी
स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते व पुलाच्या बांधकामाचे निरीक्षण आयुक्त डॉ. चौधरी यांनी यावेळी केले. नेताजीनगरातील नागनदीवर पिलरविहीन पूल बांधण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी महापालिका आयुक्तांनी दिले. यासोबत यावेळी पारडी अग्निशमन केंद्राजवळील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वॉटर ड्रेनेज तयार करण्यात येत आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. पुनापूर भागातील वॉटर ड्रेनेजसंदर्भात एक सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश दिले.

या भागातील येत्या पावसाळ्यात लोकांना त्रास होणार नाही, यासाठी आकस्मिक उपाययोजना करण्यात यावी, असेही आयुक्त डॉ. चौधरी यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement