कामठी : कामठी विधानसभा क्षेत्रातील नरसाळा व हुडकेश्वर भागातील विविध नागरी समस्यांबाबत उद्या रविवार, दि.२३ जून रोजी सायंकाळी विधान परिषद सदस्य श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या जनसंवाद कार्यक्रमात कामठीचे आमदार श्री टेकचंद सावरकर हे देखील उपस्थित राहतील. सायंकाळी ४ वा. नरसाळा परिसरातील सत्यसाई कॉन्व्हेंट, प्रभाग नगर यथे श्री बावनकुळे जनतेशी संवाद साधतील.
त्यानंतर सायं. ५ वा. नरसाळा संभाजी नगर परिसरातील हनुमान मंदिर सभामंडपात जनसंवाद कार्यक्रमात सहभागी होतील. सायं. ६ वा. हुडकेश्वर परिसरातील शारदा नगर सभामंडप तर सायं. ७ वा. हुडकेश्वर कडू नगर येथील हनुमान मंदिर सभामंडपात जनसंवाद कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधतील.
नागरिकांनी त्यांच्या समस्या व अडचणींची निवेदने घेऊन जनसंवाद कार्यक्रमात पोहोचावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पेपर लीक पर फडणवीस के इस्तीफे की मांग तेज
विकास निधि कार्यों में टेंडर घोटाले, जांच की मांग
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate





