Published On : Tue, Aug 19th, 2025
By Nagpur Today Nagpur News

आ. संदीप जोशी यांचा वाढदिवस ‘लोकसेवा दिवस’ म्हणून साजरा होणार

दिवसभर विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर : महाराष्ट्र विधानतीपरिषदेतील आमदार श्री. संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 20 ऑगस्ट) दिवसभर सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध भागात होणाऱ्या या उपक्रमांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. विशेष म्हणजे हा दिवस ‘लोकसेवा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 ते 10 या वेळेत आमदार संदीप जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयात होणार असून, त्यानंतर सकाळी 9.45 वाजता बॅटरी ऑपरेटेड गाड्यांचे वितरण करण्यात येईल. सकाळी 10 वाजता श्रद्धानंद अनाथ आश्रमात फळवाटप, सकाळी 10.15 वाजता ज्युपिटर हायस्कूल, खामला येथे आरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे. याचबरोबर अमृत लॉन, मनीषनगर येथे शासकीय योजनांविषयी माहिती देणारे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सकाळी 11.15 वाजता रामेश्वरी परिसरातील संत कैकाडी महाराज उद्यान येथे आरोग्य शिबिर घेण्यात येईल. त्यानंतर 11.30 वाजता धनश्री मंगल कार्यालय, भगवान नगर येथील बुद्ध विहार येथे भंतेजीना चिवरदान करण्यात येईल. सकाळी 11.45 वाजता मेडिकल पारिसरातील ‘दीनदयाळ थाळी’ ला आमदार संदीप जोशी भेट देतील. रुग्ण नातेवाईकांचे आशीर्वाद घेतील.

दुपारी व सायंकाळीही नागरिकाभिमुख कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी 1 ते 3 या वेळेत जनसंपर्क कार्यालयात भेटीगाठी होतील. सायंकाळी 5 वाजता तकीया येथील बिरसा मुंडा हॉलमध्ये सुंंदरकांड पठण होणार असून, 5.30 वाजता वासुदेव नगर मेट्रो स्टेशन समोरील लुंबिनीनगर बुद्धविहार येथे हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम होईल.

सायंकाळी 6.30 वाजता भगवती लॉन, त्रिमूर्तीनगर येथे भव्य कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 7 वाजता नरेंद्रनगर चौक येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येईल. रात्री 7.30 वाजता रामेश्वरीतील काशीनगर येथे दहीहंडी कार्यक्रमाला आ. जोशी उपस्थित राहतील.

आ. संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हे सर्व उपक्रम समाजाभिमुखतेचे दर्शन घडवणारे असून, आरोग्य, शिक्षण व सामाजिक भल्यासाठी विविध स्तरांवर काम करण्याचा संकल्प या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement