Published On : Fri, May 28th, 2021

चला…! ३१ मे रोजी तंबाखू सोडण्याची शपथ घेऊ ! !

या वर्षी ‘हॅशटॅग टोबॅको फ्री महाराष्ट्र ‘ थीम जाहीर

तंबाखू सोडायचा…डायल करा टोल फ्री क्रमांक १८००-११-२३५६

Advertisement

नागपूर: यावर्षी ३१ मे रोजी तंबाखू नकार दिन हा ‘तंबाखू सोडण्याची वचनबद्धता आणि त्यासाठीचे शपथपत्र ‘, या विषयावर आधारित आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे मोठ्या प्रमाणात ‘हाशटग टोबॅको फ्री महाराष्ट्र ‘ मोहिम राबवली जाणार आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सोडण्यासाठी या दिवशी शपथ घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे.

महाराष्ट्र विशेषता विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तंबाखू सेवनामुळे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी तंबाखू सेवनामुळे हजारो नागरिकांना जीव गमवावा लागतो. 31 मे हा तंबाखू नकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी व्यसनाच्या आहारी गेलेल्यानी व्यसन मुक्तीचा ध्यास घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या एकूण संख्येत 60% लोक तंबाखू सेवनामुळे मृत पावतात. 2030 पर्यंत ही संख्या 80% पर्यंत जाण्याचे भाकीत केले गेले आहे.तंबाखू सेवनामुळे मधुमेह, कर्करोग ,
पक्षघात, उच्च रक्तदाब, अंधत्व, श्वसनाचे आजार होण्याचा धोका संभवतो.तसेच कोरोना होण्याचा धोका ही वाढतो.तंबाखू सोडल्यास ८ तासात ऑक्सिजन लेव्हल नॉर्मल होते.एक वर्षामध्ये हृदयरोग होण्याचा धोका निर्माण होतो.

तंबाखू सेवन इतर आजार प्रमाणेच आहे . तुम्ही व्यसनाच्या आहारी गेले असल्यास व्यसनमुक्तीचा ध्यास घ्या. तंबाखू पासून होणाऱ्या आजरांपासून स्वःतच रक्षण करा.

तंबाखू सोडण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-11-2356 या वर संपर्क करा,असे आवाहन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सर्वोपचार रूग्णालयाचे सदस्य देवेंद्र पातुरकर यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement